आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुनश्च हरिओम:महाराष्ट्राचे चित्र वेगाने बदलण्याची गरज, कोण पार्सल अन् वस्ताद निपाणीत सांगणार; शरद पवारांचा फडणवीसांवर पलटवार

सांगोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुनश्च हरिओम करुन वेगाने महाराष्ट्राचे चित्र कसे बदलता येईल याची काळजी घ्यायचे मी ठरवले आहे. आता मी निपाणीला चाललो आहे. त्यामुळे कोण पार्सल आहे अन् कोण किती वस्ताद आहे ते तिथे जाऊन खोलात बोलायचे इथे नाही, अशाप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 'साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष' या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा साडे तीन जिल्ह्याचा पक्ष आहे. तरीही कर्नाटकात निवडणुका लढत आहे. हे पार्सल फेकून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकातील जनतेला केले होते. यावर शरद पवारांनी पलटवार केला आहे.

गैरसमज दूर झाला

शरद पवार म्हणाले, मी राजीनामा दिल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते आणि हितचिंतक अस्वस्थ होते. त्यांच्यासाठी मला माझा निर्णय बदलावा लागला. निर्णय बदलावे लागले त्यात एक गैरसमज होता. मी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला याचा अर्थ संघटनेचे काम सोडले नव्हते. लोकांशी संपर्क करायचा ठरवले होते. पण तो गैरसमज झाला. आज तो दूर झाला याचा आनंद आहे.

कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारे शहर

शरद पवार म्हणाले, माझी अनेक वर्षांची पद्धत आहे. सुरुवात करायची असेल तर सोलापूर नाहीतर कोल्हापूर. सोलापूरपासून दौऱ्यावर जावे हा विचार होता. त्यामुळे मी आलो. सामान्य कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारे हे शहर आहे. त्यामुळे मी इथे आलो, असा उल्लेख यावेळी शरद पवारांनी केला.