आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:17 व 18 नोव्हेंबरला ऊसतोड बंद ठेवण्याचा शेट्टींचा इशारा

कोल्हापूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून १७ आणि १८ नोव्हेंबरला ऊसतोड बंद ठेवून केंद्र सरकारला ताकद दाखवूया. साखरेचे दर क्विंटल मागे ३१०० वरून ३५०० रुपये करावे, इथेनॉलचे दर ५ रुपयांनी वाढवावेत, अशी मागणी या आंदोलनातून केली आहे. तर गायरान अतिक्रणाबाबत सामान्य गरिबांना वेळ द्यावा, अन्यथा स्वाभिमानी कायदा हातात घेउन रस्त्यावर उतरून न्याय मागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. शेट्टी पुढे म्हणाले, पुण्यातील मोर्चाने साखर आयुक्तांनी १५ दिवसांत कारखान्यांनी हिशेब द्यावेत, असे आदेश दिलेत. मात्र त्यासाठी समिती नेमण्याची गरज असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...