आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची कोल्हापुरात डरकाळी:शिंदे-फडणवीस सरकार गद्दारांचे... हे घटनाबाह्य सरकार कोसळणार

कोल्हापूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
 आदित्य ठाकरे - Divya Marathi
 आदित्य ठाकरे

उठाव आणि बंड करायला हिम्मत लागते. शिवसेनेशी बेईमानी केलेले आमदार हे गद्दार आहेत. राज्यात स्थापन आलेले शिंदे-फडणवीस यांचे सरकार हे बेइमान आणि गद्दारांचे आहे. हे घटनाबाह्य सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच, अशी डरकाळी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी कोल्हापुरात फोडली. कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथे आयोजित शिवसंवाद यात्रेत ते बोलत होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ठाकरे हे भाषण करायला उभे राहिले. यावेळी पावसाला सुरुवात झाली. ठाकरे यांनी भरपावसात भाषण चालू ठेवले.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर आदित्य ठाकरे बंडखोरांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढत आहेत. त्यांची आज शिवसंवाद यात्रा कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचली आणि कोल्हापुरातील शिवसैनिकांची पावले मिरजकर तिकटीकडे पडली. फडफडणारे भगवे ध्वज आणि स्वागताला ४० फुटी हार अशा जल्लोष वातावरणात आदित्य ठाकरे यांच कोल्हापुरात खरी कॉर्नर येथील शहर शिवसेना कार्यालयात जल्लोषात स्वागत करण्यात आले. उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले.

आजरा तालुक्यात बोलताना कोल्हापूर जिल्ह्यातील बंडखोर शिवसेना आमदार आणि खासदारांवर चांगलाच हल्ला चढवला. यानंतर कोल्हापूर शहरातील सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या चाळीस आमदार व बारा खासदारावंर हल्लाबोल केला.

गद्दारीचा शिक्का कधीच पुसून निघणार नाही
शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले आमदार व खासदार हे गद्दार आहेत. त्यांच्यावरील गद्दारीचा शिक्का कधीच पुसला जाणार नाही. त्यांनी हिम्मत असेल तर आमदारकीचा आणि खासदारकीचा राजीनामा द्यावा व निवडणुकींना सामोरे जावे, असे खुले आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...