आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंत पाटील यांची टीका:शिंदे-फडणवीस सरकारने निषेध न केल्याने बोम्मईंची हिंमत वाढली

सांगली4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कोणतेही कारण नसताना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांवर हक्क सांगितला. त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. परंतु राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह राज्य भाजपने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा तीव्र शब्दांत निषेध न केल्याने गुरुवारी सोलापूर आणि अक्कलकोट येथील अनेक भागांवरही आपला हक्क सांगण्याची हिंमत त्यांनी दाखवली आहे. याबरोबरच सीमाभागाचा जटिल प्रश्न माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे निर्माण झाल्याचा अजब तर्क भाजपने मांडल्याने त्यांना महाराष्ट्राची अस्मिता नसून केवळ राजकीय हेतू साध्य करण्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केली.

बातम्या आणखी आहेत...