आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेचा लॉंग मार्च:छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा त्वरित बसवण्याची मागणी, शिवसेनेची थेट बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्तीत धडक

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती ( ता. हुक्केरी) गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता. बेळगाव प्रशासनाने हा पुतळा एका रात्रीत हटवला. त्याविषयी तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर बेळगाव जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन यांनी संयुक्त बैठक घेऊन पंधरा दिवसात पुतळा बसविण्याची ग्वाही दिली होती. मात्र ती मुदत संपल्यानंतरही पुतळा बसविण्यात आलेला नाही. परिणामी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मंगळवारी दुपारी लॉंग मार्च काढून थेट मनगुत्ती गावात धडक दिली.

शिवसेनेच्यावतीने कवळीकट्टी ते मणगुत्ती असा लाॅंगमार्च काढण्यात येणार होता, या पार्श्वभूमीवर या मार्गावर प्रचंड पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या मध्येमहाराष्ट्रातील पोलिस व कर्नाटकातील पोलिसही तैनात होते. कर्नाटक पोलिसांनी मनगुत्ती गावाच्या अलिकडेच आंदोलकांना रोखले.

मनगुत्ती गावात आठ दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा. त्यासाठी बेळगाव जिल्हाधिकारी व कोल्हापूर जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक घ्यावी. दोन्ही राज्यातील मंत्र्यांचाही समावेश असावा, अशी मागणी शिवसैनिकांनी यावेळी केली यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सांगितले. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार यावेळी उपस्थित होते. शिवसेनेच्यावतीने बेळगाव जिल्हाधिकारी यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.