आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवराज्याभिषेक सोहळा थाटात:रायगडावर 2 वर्षांनंतर शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा

रायगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड किल्ल्यावर ढोल-ताशाचा गजर, मंत्रोच्चार, शंखनादात सोमवारी शिवराज्याभिषेक सोहळा थाटात साजरा झाला. गेल्या दोन वर्षांत कोरोना संसर्गामुळे शिवभक्तांना शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होता आले नव्हते. यंदा कोरोना निर्बंध शिथिल झाल्यामुळे हजारो शिवभक्तांनी गडावर हजेरी लावली. शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या वेळी शिवप्रतिमेला अभिषेक केला.

बातम्या आणखी आहेत...