आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजकारण:भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आंबा पडल्यासारखे अचानक मोठे झालेत, पण पायदळी यायला वेळ लागणार नाही; माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची टीका

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट काय होतो ते नारायण राणेंनी अनुभवलंय, त्यामुळे टीका करताना विचार करा, चंद्रकांत पाटलांना सल्ला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पायदळी यायला वेळ लागणार नाही, कारण त्यांचे नेतृत्व आंबा पडल्यासारखे अचानक पुढे आलेले आहे अशी टीका शिवसेनेचे माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा सरकारी रुग्णालयात (सीपीआर) येथे एक कोटिंचे बेड प्रदान कार्यक्रमाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटलांच्या टीकेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामावर परिणाम होणार नाही. मुख्यमंत्री ठाकरे हे संयमी नेतृत्व आहे. राज्यभर उगाच दिंडोरा पिटवून राज्यकारभार होत नाही, जे गेल्या पाच वर्षांत भाजपने केले आहे.

चंद्रकांत पाटलांना युतीचा इतिहास माहीत नसेल. गेल्या तीस वर्षांपासून भाजप आणि सेना युती होती. या तीस वर्षांत मातोश्रीवरील नेत्यांनी कधीही मीडियाला बाईट दिला नाही. ते फक्त सामनामधून व्यक्त होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरी या सहा वर्षांत मीडियाला बाईट दिला आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दोन दिवसांपूर्वी पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना व्यतिरिक्त इतर मीडियाला मुलाखत देऊन दाखवावे असे आव्हान दिले होते. त्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर यांनी पाटिल यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट काय होतो हे नारायण राणेंनी अनुभवलं आहे. त्यामुळे टीका करताना विचार करून करावी, असा सल्लाही क्षीरसागर यांनी दिला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सीपीआर रुग्णालयाला जवळपास एक कोटी रुपयांच्या खाटा, व्हेंटिलेटरसह इतर साहित्याची मदत देण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पश्र्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सीपीआरचे अधिष्ठाता चंद्रकांत म्हस्के उपस्थित होते.