आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कराड तालुक्यातील सवादे गावातील धक्कादायक घटना:गणपतीच्या आरतीवेळी वीजेचा शॉक लागून आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

सातारा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणपतीच्या आरतीवेळी वीजेचा शॉक लागून आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना कराड तालुक्यातील सवादे-नाईकवाडी गावात घडली आहे. अर्पिता प्रकाश शेवाळे (वय 8) असे मृत मुलीचे नाव आहे. शुक्रवारी नाशिकमध्ये देखील एका चिमुकलीचा असाच मृत्यू झाला होता.

सवादे (ता. कराड) गावच्या बसथांब्याजवळ नाईकवाडी नावाची मोठी वस्ती आहे. तेथील सिद्धनाथ मंदिरात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सायंकाळी गणपतीची आरती सुरू असताना वायरला स्पर्श होताच अर्पिताला जबर शॉक लागला.

सवादे गावावर शोककळा

वीजेचा शॉक लागल्यानंतर अर्पिताला तातडीने रूणालयात दाखल करण्यासाठी सगळ्यांची धावपळ सुरू झाली. परंतु तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने तिच्या कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे. ऐन गणेशोत्सवात आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याने सवादे गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.

आइस्क्रीम पार्लरमध्ये फ्रीजचा शॉक

नाशिकमध्ये आईस्क्रीम घ्यायला गेलेल्या मुलीचा फ्रीजचा शाॅक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. ही हृदयद्रावक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, त्याचा व्हिडीओही काल समोर आला होता. नाशिकच्या त्रिमूर्ती चौक परिसरातील काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

अशी घडली घटना

एक मुलगी आईस्क्रीम घ्यायला गेली असताना फ्रिजसमोर ती उभी राहिली. त्यानंतर चिमुकलीला विजेचा धक्का बसला व यातच तिचा मृत्यू झाला. ग्रीष्मा विशाल कुलकर्णी असे मृत मुलीचे नाव आहे. ग्रीष्माच्या मृत्यूने कुलकर्णी कुटुंबासह परिसरावर शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...