आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:व्हेल माशाची उलटी विकणाऱ्या सहा जणांच्या टोळीला कोल्हापूरमध्ये अटक, कस्तुरीसारखे सुगंध तयार करण्यासाठी वापर

कोल्हापूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली जिल्ह्यात व्हेल माशाची उलटी विकणारी टोळी सक्रिय झाली होती. याबाबत कोल्हापूर वन विभागाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बोगस ग्राहकाच्या माध्यमातून या टोळीला कोल्हापुरात बोलावून घेतले. न्यू पॅलेस परिसरात सापळा रचून या टोळीतील ६ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडील सव्वातीन कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी, ५ मोबाइल, २ दुचाकी आणि चारचाकी असे ३ कोटी ५० लाखांचे साहित्य जप्त करण्यात कोल्हापूर वन विभागातील कर्मचाऱ्यांना यश आले.

कस्तुरीसारखे सुगंध तयार करण्यासाठी वापर:
व्हेल माशाच्या उलटीला उच्च किंमत मिळण्यामागचे कारण म्हणजे परफ्युम मार्केटमध्ये त्याचा होणारा वापर हे आहे. विशेषत: कस्तुरीसारखे सुगंध तयार करण्यासाठी व्हेल माशाची उलटी वापरली जाते. परफ्युमची मोठी बाजारपेठ असलेल्या दुबईसारख्या देशांमध्ये याला जास्त मागणी असल्याचे मानले जाते. प्राचीन इजिप्शियन लोक ते धूप म्हणून वापरत. हे काही पारंपरिक औषधांमध्येदेखील वापरले जात असल्याचे सांगण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...