आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गारपीट:कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट, जमिनीवर साचला गारांचा थर

कोल्हापूर7 दिवसांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी वळवाच्या पावसाने जोरदार तडाखा दिला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरींसह गारांचा जोरदार वर्षाव सुरू झाला. रस्त्यावर सर्वत्र गारांचा खच पडला होता. गेल्या काही वर्षांत प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यात असा गारपीठीचा पाऊस झाला. गारपीटीमुळे कोल्हापूरवासियांनी काही काळ गारवा अनुभवला.

गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात वळवाच्या पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवसापूर्वी कागल तालुक्यातील नंद्याळ, अर्जुनवाडा, मुगळी येथे गारपीठ झाली. नंद्याळ आणि अर्जुनवाडा येथे अक्षरश: गारांचा पाऊस पडला. हिमवृष्टी झाल्यासारखे जमीनीवर पांढऱ्या गारांचा थर साचला होता.

आज जिल्ह्यासह शहरातही गारांचा वर्षाव झाला. शहरात खूप वर्षांनी इतक्या मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शहरवासीय सुखावले. जिल्हयाच्या विविध भागात अर्धा ते पाऊणतास गारांचा वर्षाव सुरू होता. वीजांच्या कडकडटासह वळवाचा पाऊस कोसळत राहिल्याने हवेत गारवा निर्माण झाला. लहान मुलांनी गारपीटीच्या पाऊसाचा मनमुराद आनंद लुटला. अत्यावश्यक सेवेत काम करणार्यांची मात्र तारांबळ उडाली.

बातम्या आणखी आहेत...