आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:सामाजिक कार्यकर्त्याची नगरपालिकेसमोर पेटवून घेऊन आत्महत्या, इचलकरंजी नगरपालिकेतील धक्कादायक घटना

कोल्हापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

घंटागाडीला मृत डुक्कर बांधून ओढत नेत असताना सामाजिक कार्यकर्ते भोरे यांनी नगरपालिकेच्या ठेकेदाराला अडवले. पण ठेकेदाराने त्यांनाच शिविगाळ व मारहाण केली. ठेकेदारावर कारवाई करा अन्यथा आत्मदहन करू असा इशारा भोरे यांनी नगरपालिकेला दिला होता. आठ दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची नगरपालिकेने दखलच घेतली नाही. यामुळे संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी इचलकरंजी नगरपालिकेच्या समोरच स्वतःला पेटवून घेतले. यात ते गंभीररित्या होरपळले. सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे इचलकरंजी नगरपालिकेत एकच खळबळ उडाली. मृत्यूची माहिती समजताच नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. त्यांनी संबंधित दोषींवर कारवाई जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हॉस्पिटल परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

घंटागाडीला मृत डुक्कर बांधून ओढत नेत असताना भोरे यांनी नगरपालिकेच्या ठेकेदाराला अडवले. जनावरे पकडण्याच्या ठेका दिलेल्या या ठेकेदाराबरोबर त्यांचा वाद झाला. मृत जनावर ओढत नेण्याऐवजी घंटागाडीत टाकून घेऊन जा, अशी विनंती त्यांनी त्या ठेकेदाराला केली. पण, त्याला नकार देत ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांनी भोरे यांनाच शिवीगाळ व मारहाण केली.

आठ दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराबाबत मोरे यांनी पुराव्यासह नगरपालिका अधिकार्यांकडे तक्रार केली होती. अधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेतली नाही. शनिवारी भोरे यांनी बैठक घेऊन सोमवारपर्यंत याबाबत कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. नगरपालिकेच्या दारातच घडलेल्या या घटनेने इचलकरंजीत खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांत फिर्याद दाखल झाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.