आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोल्हापूर:सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांसाठी लवकरच शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक संकुल - उदय सामंत

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

मराठी भाषिक विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या प्रगत बनवण्यासाठी सीमावर्ती भागातील दहा एकर परिसरात शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक संकुल लवकरच उभारण्यात येणार आहे. संकुलाचे काम दोन टप्प्यात होणार आहे.   यावर्षीपासून विद्यापीठाशी संलग्न पारंपारिक अभ्यासक्रमासह कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत., अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत दिली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे आज कोल्हापूर दौर्‍यावर होते. सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केंद्र किंवा मराठी भाषेतील महाविद्यालय स्थापन करण्याबाबत समितीसोबत मंत्री सामंत यांची बैठक संपन्न झाली. सीमाभागात महाविद्यालय व तंत्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीने चंदगड तालुक्यामध्ये तीन ठिकाणी जागा पाहिली होती याबाबत आज शिक्षणमंत्र्यांच्या  उपस्थितीत शैक्षणिक संकुल उभारण्याचा निर्णय झाला.

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सामंत यांनी अंतिमसत्राच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन निकाल जाहीर करण्यात येईल. ज्यांना ग्रेड सुधारायची असेल त्यांच्यासाठी कोरोना परीस्थिती सुधारणा झाल्यावर डिसेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येणार आहेत. युजीसीने अंतिमसत्रासाठीचा हा निर्णय देशभर लागू करावा यासाठी पत्रव्यवहार करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

अंतिमसत्राच्या परीक्षांवरुन महाविकास आघाडीचा जो आरोप आहे त्याबाबत विचारले असता, त्यांचा आरोप चुकीचा आहे. देशातील दिल्ली, राजस्थान, पंजाब या राज्यांतही परीक्षा होणार नाहीत. कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत असे त्यांनी सांगितले.

विनोद तावडेंवर टीका 

विनोद तावडे यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक जी. आर. काढले आणि मागे घेतले, मी मात्र एकच जीर काढला आहे आणि त्यावर ठाम आहे.

तो व्हिडिओ एडिटिंग केला आहे....

खासदार विनायक राऊत यांच्या मुलांचा जो व्हिडिओ आहे तो एडिटिंग केलेला आहे. हे विरोधकांनी केलेले काम आहे. राऊत यांचा मुलगा निर्व्यसनी असल्याचा खुलासा सामंत यांनी केला.

राज्यातील ग्रंथालये लवकरच निर्णय

राज्यातील ग्रंथालये लवकरच सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. कोरोना परीस्थितीवर बर्याच गोष्टी अवलंबून आहेत असेही ते म्हणाले.