आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक सीमाप्रश्नी राज्य सरकार केंद्रापुढे नतमस्तक:काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हल्लाबोल

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या कोणत्याही मंत्र्याने बेळगावला येऊ नका म्हणून सांगतात. याचा अर्थ महाराष्ट्रातील सरकार केंद्राच्या सत्तेपुढे नतमस्तक झाले आहे. फक्त सत्तापिपासूपणा आणि राज्याची तिजोरी लुटणे एवढेच महाराष्ट्रातील ईडी सरकारचे चित्र पाहायला मिळत असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कराडमध्ये माध्यमांशी बोलताना केला. जनता महाराष्ट्राचे लचके तोडू देणार नाही, जनतेच्या पाठीशी राहून काँग्रेस सीमावादाची लढाई लढेल, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल बोलताना पटोले म्हणाले की, ‘देशाचा खरा इतिहास पुसून टाकायचा ही मनुवाद्यांची मानसिकता आहे. मनुव्यवस्थेच्या आधारे त्यांना जो इतिहास निर्माण करायचाय त्याची ही परिणती आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. त्यामुळेच त्यांच्या विचारांचा अपमान केला जात आहे. त्यामुळे जशास तसे उत्तर देण्याची गरज आहे. आम्ही शिवशाहीसोबत राहणार आहोत. ज्यांना पेशवाईसोबत राहायचे असेल त्यांनी राहावे.’

पटोले म्हणाले की, देशातील न्यायाधीश जर माध्यमांसमोर जाऊन न्याय मागतात त्यावरून देशातील परिस्थिती लक्षात येते. न्यायव्यवस्थेवर सरकारचा किती दबाव आहे ते स्पष्ट होते. लोकशाहीच्या चारही स्तंभांना स्वायत्तता राहिलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...