आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बेळगाव जिल्ह्यातील पिरणवाडी गावच्या प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात संगोळी रायण्णा यांचा पुतळा बसविल्याने बेळगावात पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे. रायण्णा यांचा पुतळा बसविण्यास विरोध असून देखील कन्नड संघटनांनी (दि. 27) रोजी पोलिसांच्या उपस्थितीत रात्री पुतळा बसविला. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी मोर्चा काढत घोषणाबाजी करून तीव्र विरोध दर्शविला. मात्र, पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलनकर्त्यांवर जोरदार लाठीमार करण्यात आला. या सर्व परिस्थितीमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुन्हा एकदा पुतळ्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. पिरणवाडी गावात संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रायन्ना यांचा पुतळा बसवल्याने पुन्हा एकदा वादाला सुरूवात झाली आहे. यामुळे पिरनवाडी गावातील मराठी भाषिक हे रस्त्यावर उतरले आहेत.
रायन्ना यांच्या पुतळ्याला मराठी भाषिकांचा तीव्र विरोध आहे. अशात कन्नड संघटनांनी गुरुवारी मध्यरात्री 3 वाजता रायन्ना यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यासमोर बसवला. रायन्ना यांचा पुतळा इतर ठिकाणी हलवा अशी मागणी मराठी भाषिक करत आहेत. दरम्यान, याआधीही कर्नाटकातील बेळगावमधील मनगुत्ती गावात पोलिसांना रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा वाद पेटला होता. मनगुत्ती इथलं आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही केला होता
मनगुत्ती गावामध्ये 9 ऑगस्टला रोजी आंदोलन करुन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या स्थितीत तात्काळ बसवावा, अशी मागणी यावेळी सीमाभागातल्या मराठी बांधवांनी केली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.