आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोल्हापुरात पुन्हा लॉकडाऊन:कोल्हापुरात सोमवारपासून 7 दिवस राहणार कडकडीत बंद, पालकमंत्री सतेज पाटील यांची घोषणा

कोल्हापूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालकमंत्री सतेज पाटील - फाइल फोटो
  • लॉकडाऊनमध्ये सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
Advertisement
Advertisement

राज्यभरात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनारुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येत आहे. कोल्हापुरातही सोमवारपासून 7 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन करण्यात येणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी याबाबत घोषणा केली. या काळात औषध आणि दूध पुरवठा यांनाच सवलत दिली जाईल. इतर सर्व सेवा शंभर टक्के बंद राहणार आहे. या लॉकडाऊनमध्ये सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. व्यापारी, व्यावसायिक, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधींशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. 

जिल्ह्यातील रुग्णसंख्या 1938 वर, आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू 

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 310 कोरोना रुग्णांची नोदं तर 4 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 1938 वर पोहचली आहे. त्यापैकी 971 जणांना डिस्चार्ज दिला असून 924 जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

Advertisement
0