आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय जनता पक्षाला गेल्या २-३ वर्षांत अनेक ठिकाणी पीछेहाट सहन करावी लागली होती. पण देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून हे अशक्य कोट्यातील यश मिळवणे शक्य झाले आहे, असे नूतन खासदार धनंजय महाडिक म्हणाले. राज्यसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत दिमाखदार विजय मिळवल्यानंतर नूतन राज्यसभा खासदार धनंजय महाडिक व भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे कोल्हापूर येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ताराराणी चौकातून सुरू झालेल्या विजयी मिरवणुकीवर जेसीबीच्या साहाय्याने गुलालाची उधळण केली, भला मोठा पुष्पहार घालून दोन्ही नेत्यांचे स्वागत केले. अंबाबाई देवीच्या आशीर्वादाने या रॅलीची सांगता झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.