आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न:पोलिस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न

सातारा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फलटण तालुक्यासह जिल्ह्यात केलेल्या अनेक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेल्या दिगंबर आगवणेने पोलिस कोठडीत टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात आगवणेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दिगंबर आगवणे हा एकेकाळी भाजपचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा निकटचा सहकारी होता.

गत काही महिन्यांपूर्वी त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर विविध आरोप करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, हा प्रयत्न आगवणे यांच्यावरच अंगलट येऊन त्यांच्यावरच गुन्हा दाखल होऊन त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली होती. सातारा जिल्ह्यासह सोलापूर व पुणे जिल्ह्यातही आगवणे यांनी अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची प्रकरणे आता समोर येत असून फलटण येथील आयमत गनिक शेख (रा. लक्ष्मीनगर, फलटण) यांचीही लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आगवणेवर फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.

बातम्या आणखी आहेत...