आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:साताऱ्यातील बालसुधारगृहात अल्पवयीन संशयिताची आत्महत्या

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा जिल्ह्यातील वडूज पोलिसांनी अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात ताब्यात घेतलेला अल्पवयीन संशयित गेली काही दिवस सातारा येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आला होता. त्याने आज सकाळी सातारा येथील बालसुधारगृहामध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली. मृताच्या नातेवाइकांनी बालसुधारगृहाबाहेर जमण्यास सुरूवात केल्यानंतर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.याबाबत अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यातील एका गावात राहणार्‍या अल्पवयीन तरूणावर त्याच्याच नात्यातल्या युवतीवर अत्याचार केल्याचा गुन्हा वडूज पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर अल्पवयीन असल्याने त्याला सातारा येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते.

दरम्यान त्याने शनिवारी सकाळी बालसुधारगृहातच आत्महत्या केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच संबंधित युवकाच्या नातेवाइकांनी बालसुधारगृहाबाहेर मोठी गर्दी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...