आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साताऱ्यातील वाईमध्ये शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या:मूल होत नसल्याच्या नैराश्यातून दिला जीव

सातारा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूल होत नसल्याच्या नैराश्यातून शेतकरी कुटुंबातील दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वाई तालुक्यातील कणूर गावातून समोर आली आहे. तानाजी लक्ष्मण राजपुरे (वय 40) आणि पूजा तानाजी राजपुरे (वय ३६), अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.

तानाजी राजपुरे हा काही वर्षे मुंबईत माथाडी कामगार म्हणून काम करत होते. त्यानंतर गावी कणूर येथे येऊन राजपुरे दाम्पत्य शेती करत होते. लग्नाला बरीच वर्षे होऊनही त्यांना मूल होत नव्हते. या नैराश्यातूनच या दाम्पत्याने राहत्या घरात गळफास घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस पाटील सूरज जठार यांनी या घटनेची खबर दिली. त्यावरून घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली असून वाई पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...