आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घातपात झाल्याचा आरोप:पती-पत्नीसह दीड वर्षाच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू, मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार दिला

सातारा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडगाव हवेली (ता. कराड) येथील पती-पत्नीसह चिमुकलीचा भुवनेश्वर (ओडिशा) येथे मृत्यू झाल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. संबंधितांचे मृतदेह गावी आणल्यानंतर ते ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार दिला होता. या लोकांसोबत घातपात झाल्याचा आरोप नातेवाइकांसह जमावाने केला होता. शुक्रवार, २९ रोजी रात्री मृतदेहांसह रुग्णवाहिका कराड तालुका पोलिस ठाण्यात आणण्यात आली आणि तेथेच नातेवाईकांनी ठिय्या मांडला. या वेळी जमाव आक्रमक झाला होता. त्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, डीवायएसपी डॉ. रणजित पाटील यांनी जमावाशी चर्चा करत नातेवाइकांची समजूत काढत तक्रार अर्ज घेतल्यानंतर तणावाचे वातावरण निवळले. त्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांच्या उपस्थितीत त्यांच्यावर गावी अंत्यसंस्कार केले. तुषार राजेंद्र जगताप (२६), पत्नी नेहा तुषार जगताप (२१) व मुलगी शिवन्या तुषार जगताप ( दीड वर्ष, सर्व मूळ रा. वडगाव हवेली, ता. कराड) अशी मृतांची नावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...