आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:स्वाभिमानीच्या आंदोलनात पोलिस आणि कार्यकर्त्यांत जोरदार झटापट, पोलिसांनी झटापटीत राजू शेट्टी यांची कॉलर धरली

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणारे अमित शहा कोण? राजू शेट्टींचा सवाल

नव्या कृषी कायद्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना धक्काबुक्की झाली, पोलिसांनी झटापटीत राजू शेट्टी यांची कॉलर धरल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. आंदोलनाच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांकडून राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाल्याने जोरदार झटापट झाली. तरीही कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आज येथिल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येणार होते. आंदोलनस्थळी पुतळा आणताना पोलिसांनी पुतळा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनाही धक्का बुक्की झाली. यामुळे आंदोलक कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात जोरदार झटापट झाली.


शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणारे अमित शहा कोण?

शेतकरी आंदोलनाला आमचा पाठिंबा, शेतकऱ्यांच्या आंदोलनात जर जातीय आणि प्रांतिय वळण लावले तर सगळा देश पेटवून सोडू आम्ही. मला धक्का बुक्की झाली मारहाण झाली तरी फरक पडत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कायम लढू. शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणारे अमित शहा कोण लागून गेले.आज आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला पण आम्ही सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आमचे उद्दिष्ट साध्य केले असे राजू शेट्टी म्हणाले...

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser