आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध दरवाढ आंदोलन:शेतकरी संघटना आक्रमक ! रस्त्यावर दुध ओतून संताप, टँकर फोडले, कडेकोट बंदोबस्तात मुंबईला दूध रवाना

कोल्हापूर2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • आजच्या राज्य शासनाच्या बैठकीकडे दूध उत्पादकांचे लक्ष

दुध दरवाढ आंदोलन त सहभागी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. गायीच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळावे, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी पहाटेपासूनच आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाना परिसरातील टिटवे येथे गोकुळ दूध संघाचा टेम्पो अडवून हजारो लिटर दूध कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ओतून दिले. सांगली जिल्ह्यातही एक टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडले. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून कडेकोट बंदोबस्तात गोकुळचे टँकर मुंबईकडे रवाना झाले. 

राधानगरी तालुक्यातील टिटवे फाटा येथे दुधाचा टेम्पो अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले, तर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दूध संघांची वाहने अडवून दूध रस्त्यावर ओतण्यात आले. संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे आंदोलनात सहभाग घेतला. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री येथील आंदोलनात सहभाग घेऊन गोकुळ दूध संघाचे दुधाचे कॅन रस्त्यावर ओतले.

अनेक दूध संघ गाईच्या दुधाला सध्या प्रतिलिटर १६ ते २० रुपये दर देतात.  सरकारने प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावे.  दूध पावडरीची आयात बंद करावी, तसेच दूध पावडर निर्यातीला चालना मिळावी, अशी मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान आजच्या राज्य शासनाच्या बैठकीकडे दूध उत्पादकांचे लक्ष आहे. 

 • राज्यात ४८ लाख दूध उत्पादक 
 • राज्याचे प्रतिदिन दूध उत्पादन १ कोटी १९ लाख लिटर एवढे आहे.
 • वास्तविक पाहता, गेल्या चार महिन्यांपासून राज्यात दुधाचा दुष्काळ (टंचाई)
 • दररोज उत्पादन १.१९ कोटी लि.लॉकडाऊनमुळे ५२ लाख लिटर दूध ठरते आहे अतिरिक्त
 • दर १७ ते २० रुपयांनी कोसळले
 • पिशवीबंद दुधाच्या विक्रीत २० लाख लिटरने घट
 • राज्यात ५० हजार टन दूध
 • पावडरचा साठा पडून
 •  दूध पावडरचा दर ३३० रुपयांवरून १६० रुपयांवर
बातम्या आणखी आहेत...