आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा:'केंद्र सरकारला सुबुध्दी येऊ दे' या मागणीसाठी स्वाभिमानीचे रात्रभर आत्मक्लेश जागर आंदोलन

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुरुवारी रात्री 8 ते सकाळी 6 पर्यंत केले जाणार आत्मक्लेश जागर आंदोलन

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच केंद्र सरकारला सुबुध्दी येऊ दे, या मागणीसाठी आज गुरुवारी रात्री 8 वाजल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसमवेत "रात्रभर आत्मक्लेश जागर" आंदोलन करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

याबाबत बोलताना शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकारने देशातील शेतकर्यांच्यावर तीन कृषी कायदे लादले आहेत. हे कायदे अन्यायी असून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत. दिल्लीत 7 दिवसापासून कडाक्याच्या थंडीत देशभरातील शेतकरी कुडकुडीत बसले आहेत. तरीही केंद्र सरकार केवळ वेळकाढूची भूमिका घेत आहेत. त्या शेतकर्यांना पाठिंबा म्हणून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे जागर आंदोलन करण्यात येणार आहे. रात्री पिठलं भाकरं खाऊन या आंदोलनाला सुरूवात केली जाणार आहे. रात्रभर भजन आणि किर्तन केले जाणार आहे. 'केंद्र सरकारला सुबुध्दी दे' व 'शेतकऱ्यांना न्याय मिळू दे' या मागणीसाठी आत्मक्लेश जागर आंदोलन केले जाणार असून रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जागर होणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser