आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:शिवरायांच्या पुतळ्यावरुन कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडेत तनाव; परवानगी शिवाय रात्रीत बसवलेला पुतळा प्रशासनाने बंदोबस्तात हटवला

कोल्हापूर4 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • आंदोलक ताब्यात, शिवप्रेमींनी दिली बंदची हाक

कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडे गावात रविवारी मध्यरात्री अज्ञातांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला. सकाळी अचानक चौकात शिवरायांचा अर्धाकृती पुतळा पाहून नागरीकांचे कुतुहल वाढले, चौकात तरुणांची गर्दी होऊ लागली. ग्रामस्थांनी प्रशासनाला कळवले.पण परवानगी घेऊन पुतळा बसवावा, अशी भूमिका तालुका प्रशासनाने घेतल्याने याठिकाणी तनाव निर्माण झाला. त्यामुळे चौकात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. बसवलेला शिवरायांचा पुतळा हटवू नये, या भूमिकेवर शिवभक्त ठाम होते त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. पण सायंकाळी प्रशासनाने आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले. यानंतर कडेकोट बंदोबस्तात शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धा अभिषेक करुन पुतळा हटवला असून रितसर परवानगी घेऊन पुतळा बसवावा अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान शिवप्रेमींनी मंगळवारी बांबवडे मलकापूर बंदची हाक दिली आहे.

कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यात बांबवडे नावाचं गाव आहे. या गावात शिवरायांचा एकही पुतळा नव्हता. त्यामुळे अज्ञातांनी रविवारी मध्यरात्री शिवरायांचा पुतळा चौकात बसवला. मात्र या कोणत्याही परवानगीशिवाय हा पुतळा बसवल्याने तो हटवून पुन्हा परवानगी घेऊन पुतळा बसवावा, असं मत प्रशासनाचे आहे. मात्र आता कोणत्याही परिस्थितीत पुतळा हटवू नये. आम्ही या पुतळ्याचे संरक्षण करु, अशी भूमिका शिवप्रेमींनी घेतली. शिवप्रेमींनी या चौकात पुतळ्याजवळ गर्दी केली. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. रविवारी रात्री किंवा आज पहाटे बांबवडे किंवा आजपासच्या परिसरातील काही शिवप्रेमींनी या चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे. हा पुतळा परवानगी घेतल्याशिवाय बसवला. चौकात ज्या ठिकाणी पुतळा बसवला तिथून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाणे असून पोलिसांनाही पुतळा कोणी बसवला हे कळाले नाही. दिवसभर चौकात शिवप्रेमींनी ठाण मांडली होती.

दरम्यान सायंकाळी शिवप्रेमी आणि प्रशासकिय अधिकारी यांच्यामध्ये चर्चा झाली. पण शिवप्रेमी पुतळा हटवण्यासाठी तयार झाले नाहीत. त्यामुळे प्रशासकीय नियमानुसार रितसर परवानगी घेऊन पुतळा पुन्हा बसविण्यात यावा अशी ठाम भूमिका घेतली आणि आंदोलकांना ताब्यात घेतले. यानंतर प्रशासनाने कडेकोट बंदोबस्तात अभिषेक, आरती करून पुतळा हटवला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चौकात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser