आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:ठाकरे, राऊतांना भाटगिरी करणारे आवडतात, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना जसे हवे तसे म्हटले तरच त्यांच्यासाठी चांगले, त्यांची चूक दाखवली तर त्यांना खपत नाही. मग पत्रकार पण जेलमध्ये जाणार, कंगना रनौैतचे आॅफिसही तोडले जाणार. त्यांना वाटते नुसती त्यांची स्तुती करावी. पण ग्रामीण भागात याला भाटगिरी म्हणतात. पण, आम्ही भाटगिरी करणारे नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी लगावला.

ते म्हणाले, चूक दाखवली तर महाराष्ट्राची बदनामी होते, मग चुका करू नका. सुशांतसिंह राजपूतप्रकरणी वेळेत एफआयआर दाखल का झाला नाही. तुम्ही एफआयआर दाखल केला नसल्याने सीबीआय चौकशी लागली.