आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी मंत्री व भाजप समर्थक सदाभाऊ खोत यांनी माढा लोकसभेची निवडणूक लढवण्याच्या काळात सांगोला तालुक्यातील एका हॉटेल मालकाचे बिल थकवले होेते. त्यानंतर नुकतेच याप्रकरणी हॉटेल मालकाने सदाभाऊ खोतांना घेराव घातला होता. तरीही सदाभाऊंनी हे बिल देण्यास नकार दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली जिल्ह्यात भीक मांगो आंदोलनाद्वारे ही रक्कम एकत्रित करून या हॉटेल मालकाचे बिल चुकवले जाणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व भागवत जाधव यांनी दिली.
सदाभाऊ खोत हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कडवे कार्यकर्ते होते, परंतु सत्ता मिळवण्याच्या नादात त्यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या पाठीत खंजीर खुपसून राज्यमंत्रिपद मिळवले होेते. याबरोबरच सदाभाऊ खोत हे सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यातील आहेत. जिल्ह्याची बदनामी होऊ नये आणि संबंधित हॉटेल मालकाची ६६ हजार ४५० रुपयांची रक्कम बुडीत खाती जाऊ नये यासाठी जिल्ह्यात संघटनेचे कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेकडे भीक मागून सदाभाऊ खोतांच्या रूपाने रक्कम बुडवण्याचा सांगलीकरांवर लागलेला कलंक पुसणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.