आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेह सापडला:तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चौदा वर्षीय मुलीचा अखेरीस मृतदेह सापडला

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंदलगाव येथून रविवार दिनांक ४ पासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह कंदलगावातील एका विहिरीत बुधवारी सकाळी आढळला. सिद्धी बाळू पोवार (१४, सध्या रा. कंदलगाव, मूळ रा. नंद्याळ, ता. कागल) असे मृत मुलीचे नाव आहे. सिद्धी हिने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कंदलगाव येथील सिद्धी पोवार रविवारी रात्री घरात कोणाला काहीच न सांगता निघून गेली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांयनी शिरगाव पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद दिली. मात्र, मुलगी सापडली नाही. बुधवारी तिचा मृतदेह सापडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...