आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कार उभ्या कंटेनरला धडकली; एकाच कुटुंबातील पाच जण ठार, मृतात नौदल अधिकाऱ्याचा समावेश

सांगलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळ शनिवारी येवले फाटा येथे उभ्या असलेल्या कंटेनरला कारने धडक दिली. या भीषण अपघातात जयसिंगपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार झाले. हा अपघात एवढा भीषण होता की, यात कारचा अक्षरश: चुराडा झाला. सुटीसाठी पुणे येथे गेलेले नौदल अधिकारी अजिंक्य शिरोटे हे जयसिंगपूरला येत असताना शनिवार दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात अजिंक्य शिरोटे (३८), स्मिता शिरोटे (३५), पूर्वा शिरोटे (१४), सुनेषा शिरोटे, (१०) व विरेन शिरोटे (५) यांचा मृत्यू झाला. अजिंक्य शिरोटे हे आपल्या कारने (एमएच १४ डीएन ६३३९) पुण्याहून जयसिंगपूरला परतत होते. या वेळी येवले फाटा येथे रस्त्याच्या कडेला कंटेनर उभा होता. या वेळी शिरोटे यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार कंटेनरला जाऊन धडकली होती. यात ५ जणांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...