आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफझल खान कबरीजवळील अतिक्रमणाचा वाद:सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी; जमीन वनखात्याची असल्याची माहिती

सातारा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरी जवळील अनाधिकृत बांधकामावरील कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

अफझल खान स्मारक समितीच्यावतीने अ‍ॅड.निजाम पाशा यांनी सुप्रीम कोर्टात गुरूवारी याचिका दाखल केली आहे. काल घटनापीठासमोर प्रकरण आले असले तरी घटनापीठाने शुक्रवारी सुनावनी करू असे सांगितले होते. यावर आज काय सुनावनी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या याचिकेत कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडताना स्मारकला कोणताही धक्का लागणार याची काळजी घ्यावी असे आदेश देण्यात यावे, अशी मागणी पाशा यांनी केली आहे.

किल्ले प्रतापगड येथील पायथ्याशी असलेल्या अफजलखान कबरीच्या अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईस विरोध म्हणून सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर आज सुनावणी असल्यामुळे अतिक्रमण हटवण्याचे काम आज बंद ठेवण्यात आलेले आहे. पोलिस बंदोबस्त मात्र कायम आहे

नेमके प्रकरण काय?
सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबर परिसरातील अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात आली. महसूल विभाग आणि वनविभागाने काल पहाटे 4 वाजेपासूनच हे बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. सुमारे 1500 पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हे बांधकाम हटवण्यात येत आहे. विशेष म्हणजे 10 नोव्हेंबर 1659 लाच सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. या दिनाचे औचित्य साधतच राज्य सरकारने ही कारवाई सुरु केली आहे.

इतिहास काय?

10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी आदिलशहाचा सरदार अफजलखान याला मारले होते. त्याचबरोबर त्याचा वकील असलेला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याचेही मुंडके छाटले होते. या विजयाचे प्रतीक म्हणून खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानची कबर येथे बांधली होती. परंतु गेल्या काही वर्षात या कबरीभोवती बांधकामे वाढली होती आणि त्याचे उदात्तीकरण ही होत होते.

बातम्या आणखी आहेत...