आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कर्नाटक धारवाडच्या इट्टीगट्टी गावाच्या हद्दीत एका डंपरने टेम्पो ट्रॅव्हलरला धडक दिल्याने 11 जण ठार झाले आहे. तर, या भीषण अपघातात 9 जण गंभीर जखमी झाले. राष्ट्रीय महामार्ग चारवर हा अपघात घडला. प्रवाशांना घेऊन टेम्पो ट्रॅव्हलर दावणगिरीहून बेळगाव येथे निघाला होता. अपघातात टेंपो ट्रॅव्हलरचा अक्षरशः चुरा झाला आहे. यावरून ही धडक किती जोराची झाली याचा अंदाज बांधला जात आहे.
संक्रांती साजरी करण्यासाठी निघालेल्या महिलांचा मृत्यू
दावणागिरीच्या लेडीज क्लबची सहल गोव्याला जात होती. महिला पर्यटकांच्या वाहनाला चुकीच्या दिशेने आलेल्या खडी वाहू टिप्पर ने धडक दिल्याने हा अपघात घडला. गंभीर जखमींना जवळच्या हुबळी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर एका महिलेचा फक्त हात दुखावला असून तुला धारवाड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये बहुतांशी महिला 40-45 वयोगटातील आहेत. शिवाय 17 वर्षांच्या दोन युवतींचा मृतांमध्ये समावेश आहे.
पर्यटक महिला संक्रातीच्या सुटीनिमित्त गोवा सहलीवर निघाल्या होत्या. पहाटे चारच्या सुमारास त्यांनी दावणागिरी सोडली होती.सकाळी 7 च्या सुमारास धारवाड जिल्ह्यातील ईत्तीगिटी तालुक्याच्या गावाजवळ त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हल रची धडक समोरून येणाऱ्या टिप्परशी झाली. खडीवाहु टीपर चुकीच्या दिशेने येत होता. त्याच्या धडकेने महिलांच्या वाहनाचा चक्काचूर झाला. त्यात 8 महिला आणि चालक असे 9 जण जागीच ठार झाले, तर दोघींचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातानंतर टिपर चालकाने पलायन केले.
आशा नामक महिला बोलण्याच्या स्थितीत असून तिला धारवाड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सारे मृतदेह याच रुग्णालयात आणण्यात आले असून आशा यांच्याकडून त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.