आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राजकारणात नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गल्ली, गाव, तालुका आणि जिल्हा सांभाळून पुढे गेले पाहिजे. अन्यथा पराभवा सारखी अवस्था होते, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला. राज्यातील ग्रामपंचायत निकालाने महाआघाडी कुठेपर्यंत पोहचली आहे हे दाखवून दिले आहे काॅंग्रेस, राष्ष्ट्वादी आणि शिवसेला सर्वाधिक सिट मिळालेल्या आहेत असेही ते म्हणाले. आम्ही नाही पण उद्या भाजपचेच नेते चंद्रकांत पाटील यांना म्हणतील दादा, तुमच्याच गावात तुमची सत्ता नाही, असेही मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.
महाविकास आघाडीचा कारभार नागरिकांना आवडला
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वात जास्त ग्रामपंचायत जिंकल्या आहेत. यावरूनच महाविकास आघाडीचा कारभार नागरिकांना आवडला आहे. हे स्पष्ट दिसत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. यंदा प्रथमच निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. यापूर्वी बोगस दाखले काढून निवडणूक लढवली जात होती. त्याला या प्रकारामुळे लगाम बसला आहे. निवडणूक निकालानंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केल्याची घोषणा केल्यामुळे यंदा मतदानाची आकडेवारी सुद्धा वाढली आहे. त्यामुळे ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.