आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील मध्यवर्ती असलेल्या कुपवाड रस्त्यावरील कृष्णकुंज अपार्टमेंटमधील दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा फ्लॅट चोरट्यांनी भर दिवसा फोडले. यात चोरट्यांनी आठ ते नऊ तोळे सोन्याचे दागिने पळवले आहेत. अपार्टमेंटमध्ये संदीप मोरे व महिला पोलिस पूजा खाडे यांच्या फ्लॅटमध्ये चोरट्यांनी भरदिवसा हातसफाई केली. यावेळी दोघेही पोलिस कर्मचारी कर्तव्यावर होते. त्यावेळी घरी कोणीच नव्हते. सोन्याच्या दागिन्यांबरोबरच रोकडही चोरट्यांनी पळवली, मात्र ही रक्कम किती आहे, याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. घरी परतल्यानंतर या दोन्ही कर्मचाऱ्यांना आपल्या फ्लॅटमध्ये चोरी झाल्याचे कळाले. त्यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला. त्यानंतर श्वान पथकास पाचारण करण्यात आले. श्वान २०० मीटरपर्यंत माग काढल्यानंतर ते घुटमळले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.