आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना आता यापुढे सहन करणार नाही. त्यांची इतरांशी तुलना करणे हा बदमाशपणा आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या यासंदर्भातील वेदना किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी मांडू. वेदना मांडण्यासारखे त्याइतके चांगले ठिकाण दुसरे नाही. आम्ही पुढचा निर्णय तेथेच जाहीर करणार आहोत, असे भाजपचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा येथे जलमंदिर पॅलेसमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून ते अगदी खालच्या स्तराचा कार्यकर्ता अवहेलना करत आहे आणि कोणत्याही पक्षाचा वरिष्ठ नेता त्यांना यासंदर्भात सुनावत नाही. सरकारही त्यावर कारवाई करत नाही. याचा निषेध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील खा. उदयनराजे भोसले हे सातारा येथून किल्ले रायगडावर शिवसन्मान निर्धार कार्यक्रमाच्या माध्यमातून निघाले आहेत. उदयनराजे शनिवारी रायगडावर पोहोचतील.
राज्यपालांना सुरक्षा कशासाठी संभाजीराजेंचा सवाल : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक मत व्यक्त करणाऱ्या राज्यपालांना कडक सुरक्षा हा कोणता न्याय आहे, असा सवाल माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.