आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे...माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही, खासदार संभाजीराजे यांचे ट्वीट

कोल्हापूर21 दिवसांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही. पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे? असे ट्वीट खासदार संभाजीराजे यांनी केले आहे. संभाजीराजेंच्या या ट्वीटची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या आठवड्यापासून खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी राज्य दौ-यावर आहेत. नेतेमंडळींना सोबत त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. त्यांनी शरद पवार ते राज ठाकरे अशा सर्व राजकीय पक्षप्रमुखांच्या भेटीगाठी घेतल्या. शनिवारी पुण्यात त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्या वेळी बहुजन समाजाचे नेतृत्व संभाजीराजेंनी करावे, असे अॅड. आंबेडकर म्हणाले. त्यामुळेच राज्याच्या राजकारणात आता नवी समीकरणे आकारास येत असल्याचे संकेत मिळत आहेत.

या पार्श्वभूमीवर संभाजीराजे नवा पक्ष स्थापन करणार का? आणि त्यांनी पक्ष स्थापन केल्यास त्याचा फायदा भाजपला मिळणार की राष्ट्रवादीला याविषयीही तर्कवितर्क सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंच्या ट्वीटचे अनेक अर्थ लावले जात आहेत. त्यांनी सरकारवर केलेल्या गंभिर आरोपामागचे नेमके कारण काय की राजकारण ? अशी चर्चा सुरू झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...