आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:फुलांचा राजा गुलाब कचऱ्यात; कोरोनामुळे परदेशी निर्यात ठप्प, फुलशेतीला शंभर कोटींचा फटका

कोल्हापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

फुलांचा राजा गुलाब. गुलाब म्हणजे मानाचे प्रतिक. त्यामुळेच गुलाबाला मागणीही मोठी. म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात गुलाबाच्या मोठ्या बागा तयार झाल्या आहेत. गेल्या काही वर्षात गुलाबाबरोबरच जर्बेराची परदेशात निर्यात केली जात आहे. परंतु कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यात लाॅकडाऊनचा मोठा फटका फुलशेतीला बसला आहे. परदेशातील निर्यात थांबली आहे. प्रार्थना स्थळे बंद आहेत. सण-उत्सव होत नाहीत. फुले काढून तशीच टाकून देण्याची वेळ शेतकर्यावर आली आहे. परिणामी गुलाबाल अक्षरशः कचऱ्याची किंमत मिळत आहे.

कोरोना जगभरातील अनेक व्यावसायांची आर्थिक कोंडी झाली आहे. विशेषत: परदेशी आयात-निर्यात ठप्प झाल्याने त्याचा फटका देशभरातील अनेक उद्योग व्यवसायांना बसला आहे. या परिस्थितीतला कोल्हापूर जिल्ह्यातील फुल उत्पादकही सामोरे जात आहेत. कोलापुरातील फुलशेतीला कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. परदेशात होणारी फुलांची निर्यात थांबल्याने गुलाब, जर्बेरा सारख्या सजावटीच्या फुलांना थेट कचरा कुंडीत जागा मिळू लागली आहे. गेल्या पाच महिन्यात जवळपास शंभर कोटींचे नुकसान या फुल उत्पादन करणाऱ्या क्षेत्राला आणि इथल्या उत्पादकांना सहन करावे लागले आहे.

फुलशेतीला पोषक वातावरण वाावरण लाभल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात अनेक गावात मोठ्या संख्येने ग्रीन हाऊस आणि पॉली हाऊसची उभारणी झाली. विशेषत: परदेशी फुलांची लागवड येथे होवू लागली. परदेशी डच गुलाब व त्यासारख्या पंधरा जातींचे उत्पादन येथे होते. याशिवाय जर्बेरा, कॉर्नेशन, ऑर्कीड, जिप्सेफिला ही फुलेही ही उत्पादीत केली जातात. घोडावत ग्रुप आणि श्रीवर्धन बायोटेक हे दोन मोठे फुलशेती प्रकल्प वगळून वीस हून अधिक पॉलीहाऊस या भागात आहेत. शिरोळ, कोंडीगरे, चिपरी, नांदणी यासह कागल आणि वडगाव येथेही फुलशेती होते.

याभागात उत्पादीत फुलांपैकी ७० टक्के गुलाब परदेशात निर्यात होतो. विशेषत: युके आणि जपानला दरमहा २० ते २५ लाख गुलाब फुले कोल्हापूर जिल्ह्यातून रवाना होतात. पण गेल्या पाच महिन्यात फुलांना परदेशी सोडाच पण स्थानिक बाजारपेठेतही मागणी झालेली नाही. लग्नसमारंभ नाही, सभा, संमेलने नाही, सण, उत्सवावरही कोरोनाचे सावट असल्याने फुलांची मागणी घटली. परिणामी सजावटीची या फुलांचे उत्पादन झाले पण फुले फुलदानीत सजण्याऐवजी कचराकुंडीत सडून गेली.

सलग दोन वर्षे नुकसान

२०१९ मध्ये शिरोळला महापुराचा चांगलाच फटका बसला होता. यामध्ये फुलशेतीचेही आतोनात नुकसान झाले. त्यातून सावरुन नोव्हेंबर २०१९ पासून हा व्यवसाय परदेशी निर्यातीसाठी सज्ज झाला होता. पुढे पुन्हा कोरोनामुळे सगळे ठप्प झाले. पाच महिने निर्यात बंद असली तरी उत्पादन सुरु आहे. पण त्यातही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे असे श्रीवर्धन बायोटेकचे रमेश पाटील यांनी सांगीतले. दरवर्षी फुलशेतीचा निर्यातीचा हंगाम १५ ऑगस्टपासून सुरु होतो यंदा ऑगस्टमध्ये परदेशी निर्यात सुरु होते की नाही याचे काहीही संकेत नसल्याने स्थानिक बाजारपेठेतील उठावावरच उत्पादकांना समाधान मानावे लागेल असा अंदाज बांधला जात आहे.

फुलांचे होते मुलांप्रमाणे सगोपन

उत्तम प्रतिचा गुलाब निवडून त्याची लागवड पॉलीहाऊसमध्ये केली जाते. उन्हापासून संरक्षण करुन अर्धवट उमललेल्या कळ्यांचे पूर्वशीतीकरण केले जाते. चार अंश सेल्सिअस तापमानात या कळ्या ठेवल्या जातात. यानंतर फुलांची लांबी आणि दर्जानुसार प्रतवारी केली जाते. लांब दांड्याच्या गुलाबाला अधिक दर मिळतो. फुलांची तोडणी केल्यापासून परदेशात ग्राहकांची हाती गुलाब पोहचेपर्यंत त्याची खूप काळजी घ्यावी लागते.

बातम्या आणखी आहेत...