आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारांबळ:थकीत वीज बिलापोटी महावितरण कंपनीने रुग्णालयाची वीज ताेडली

सांगली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ग्रामीण रुग्णालयाचे सुमारे दीड लाख रुपये वीज बिल थकीत आहे. या थकीत वीज बिलापोटी महावितरण कंपनीने अचानक वीज कनेक्शन तोडले. दवाखान्यात इन्व्हर्टर असल्याने रात्री उशिरा हा प्रकार निदर्शनास आला. या वेळी दवाखान्यात बाळंतपणासाठी आलेली एक महिला हाेती. त्यामुळे दवाखाना प्रशासनाची तारांबळ उडाली. अखेर आमदार सुमनताई पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना खडसावल्यानंतर रात्री उशिरा वीज जोडण्यात आली.. पण तोपर्यंत रुग्णालयात भरती रुग्णांची प्रचंड तारांबळ झाली.

बातम्या आणखी आहेत...