आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांचा सांगली दौरा:शरद पवार यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं उद्घाटन पडलं पार

सांगली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं उद्घाटन झाले आहे.

स्मारकाचे लोकार्पण केल्याचा दावा-
अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पणावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारकाचे उद्घाटन ड्रोनद्वारे केल्याचा दावा भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता. परंतु पोलीस प्रशासनाकडून त्यांचा दावा फेटाळण्यात आला. प्रशासनाने स्मारक परिसरामध्ये जामर बसवल्यामुळे ड्रोन खाली कोसळल्याचं पोलिसांनी सांगितले होते.

कोरोनामुळे रखडलं होतं लोकार्पण -
सांगली महापालिकेच्या वतीने विजयनगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यात आलं आहे. तब्बल अडीच कोटी रुपयांचा निधी स्मारकासाठी खर्च करण्यात आला आहे. करोनाच्या संकटामुळे गेल्या 2 वर्षांपासून स्मारकाचं लोकार्पण रखडलं होतं. तसेच स्मारकावरून श्रेयवादाचे राजकारण रंगल्याचे पाहायला मिळालं.

बातम्या आणखी आहेत...