आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गो कोरोना गो...:बळीराजाने भात शेतीतून दिला 'गो कोरोना गो'चा संदेश, कोल्हापूर येथील आजरा तालुक्यातील शेतकरी

कोल्हापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाला हरवण्यासाठी बळीराजाने केले प्रबोधन, भात शेतीत वाक्य कोरले
Advertisement
Advertisement

जगभरातील कोरोना व्हायरसचे संकट लवकरात लवकर दूर होण्यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. देशभरातही कोरोना फैलावत चालला आहे. शासन, आरोग्य सेवा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेतच. पण सामान्य नागरिकांनीही हिम्मत बाळगून कोरोनावर मात करावी यासाठी आता बळीराजाने एक पाऊल पुढे टाकत भात शेतात गो कोरोना गो हे वाक्य कोरले आहे.

रामदास आठवले यांचे गो कोरोना गो हे वाक्य संपूर्ण देशभर गाजले.  कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील एक शेतकऱ्याने गो कोरोना गो अशा अक्षारांची भात पेरणी केली. सचिन सदाशिव केसरकर असे साळगाव इथल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. ग्रामीण भागात देखील आता कोरोनाने शिरकाव केल्याने गाव पातळीवर कोरोनाला हरवण्यासाठी अशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य सेवक,पोलीस कर्मचारी, विविध संघटना नागरिकांचे प्रबोधन करत आहे. यामध्ये बळीराजा देखील मागे राहिला नाही. त्यांनी देखील आपल्या शेतातून नागरिकांचा प्रबोधन प्रयत्न केला आहे. 

Advertisement
0