आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता:गोडसे जेवढे वाचाल तेवढे त्यांचे भक्त व्हाल : कालीचरण महाराज

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातत्याने वादग्रस्त विधान करणारे कालीचरण महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. “नथुराम गोडसे जेवढे वाचाल तेवढे त्यांचे भक्त व्हाल, गांधींचे विरोधक व्हाल. त्यांनी जे केले ते योग्यच होते,’ असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. यामुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

कालीचरण महाराजांनी रायपूर येथील धर्मसभेत महात्मा गांधी यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना ९५ दिवस गजाआड देखील राहावे लागले. मात्र, त्यानंतरही त्यांची वादग्रस्त विधानाची मालिका संपलेली नाही.