आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:संघर्ष कधी करायचा हे ज्याला कळते तोच नेता - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सारथी उपकेंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले

संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे ज्याला कळते, त्याचबरोबर जो वादाऐवजी संवादावर भर देतो आणि समाजाचं चोहोबाजूंनी रक्षण करतो तोच खरा नेता होऊ शकतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. राजर्षी शाहू महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर येथे सुरू करण्यात आलेल्या पहिल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव संस्थेच्या (सारथी) उपकेंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले त्या वेळी ते बोलत होते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संभाजीराजे छत्रपती, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण हे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. आरक्षणाच्या अनुषंगाने कायद्याची लढाई शासनाने सोडलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार संभाजीराजेंनी राज्यातील पहिले उपकेंद्र कोल्हापुरात सुरू केल्याबद्दल सरकारचे आभार मानून या उपकेंद्रासाठी शासनाने किमान ५ एकरांपेक्षा अधिक जमीन द्यावी अशी मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...