आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सांगली:शरद पवारांपेक्षा राज्य सरकारची भूमिका वेगळी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कबुली

सांगली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शरद पवार यांच्या ‘लॉकडाऊन’ भूमिकेपेक्षा राज्यात काही ठिकाणी वेगळी भूमिका

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लॉकडाऊन’ भूमिकेपेक्षा राज्यात काही ठिकाणी वेगळी भूमिका आघाडी सरकारला घ्यावी लागत आहे, अशी स्पष्ट कबुली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सांगली महापालिका क्षेत्रात बुधवारी मध्यरात्रीपासून (दि. ३०) लॉकडाऊन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सांगली महापालिका परिक्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्याला रोखण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींची आणि प्रशासनाशी संयुक्त बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यात उपचारासाठी ५४५ रुग्ण असून आजपर्यंत एक हजार १३ रुग्ण पॉझिटिव्ह ठरले आहेत, तर ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात ३३२ रुग्ण पॉझिटिव्ह ठरले आहेत, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. या बैठकीला कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार संजय पाटील उपस्थित होते. दरम्यान, गोपीचंद पडाळकर आणि सदाभाऊ खोत यांना बैठकीत येऊ देण्यात आले नाही. यावरून आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

खोत-पडळकरांना नाे एंट्री
लोकप्रतिनिधींच्या बैठकीत भाजपचे माजी मंत्री सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांना रोखण्यात आले होते. तसेच या बैठकीला उपस्थित असणारे भाजपचे खासदार आणि दोन आमदारांनी निषेध व्यक्त केला नाही. याबाबतही सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी खेद व्यक्त केला.