आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:काँग्रेसच्या पालकमंत्र्यासह शिवसेनेच्या खासदारांच्या वाहनाचे स्टेरिंग भाजप खासदारांच्या हातात

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण पाहणीसाठी एकत्र गेलेल्या नेतेमंडळींमुळे राजकीय वर्तुळात चर्चा

राज्याचे गृहराज्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार प्राध्यापक संजय मंडलिक व धैर्यशील माने यांनी शनिवारी चक्क भाजपचे राज्यसभेतील खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत एकाच वाहनातून काही काळ प्रवास केला. निमित्त होते कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाचे. तीनही खासदार व पालकमंत्री एकाच वाहनातून गेल्याने तर्क वितर्कांना उधाण आले होते. काँग्रेसचे पालकमंत्री व शिवसेनेच्या खासदारांचे सारथ्य भाजपच्या खासदारांनी केल्याने राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेचा बनला होता.

कोल्हापुरातील नाईट लँडिंग बाबत नागरी उड्डाण संचानालय यांनी अडथळे काढण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यापैकी काही अडथळे काढण्यात आले असून काहींमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या माध्यमातून नागरी उड्डाण संचानालय अधिकाऱ्यांसोबत दिल्लीला पुढील आठवड्यामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

विमानतळ बिल्डिंग कामामध्ये कोरोना संकटामुळे काही काळ व्यत्यय आल्याने हे काम आता येणाऱ्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त ६४ एकर जागा संपादित केली जाणार आहे. या भूसंपादनासाठी राज्य शासनाने दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या भूसंपादनामुळे धाव विस्तारीकरण १३७० मी. वरून २३०० मीटरपर्यंत होणार आहे. विमानतळासाठी लागणाऱ्या पाणी पुरवठ्यासाठी जिल्हा परिषदेकडून येणार्या १५ दिवसांमध्ये पाईपलाईन टाकून पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे. सोबतच समर्पित ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे सुद्धा काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत सुमारे २ लाख १३ हजार प्रवाशांनी कोल्हापूर विमानतळावरून प्रवास केला आहे.

बातम्या आणखी आहेत...