आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना लस:'...तर राज्य सरकार कोरोना लस मोफत करण्याचा प्रयत्न करेल'-आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

कोल्हापूर12 दिवसांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

कोरोनावरील लस सर्व नागरिकांना मोफत मिळाली पाहिजे ही राज्य शासनाची भूमिका आहे. ही लस मोफत द्यावी यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. केंद्र सरकारने याला परवानगी नाही दिली तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निश्चितपणे लस मोफत देण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केला. ते कोल्हापुरात बोलत होते.

राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात 29 हजार 500 जणांची नोंदणी झाली आहे. आज जिल्ह्यात चार ठिकाणी ड्राय रन चाचणी सुरू केली आहे. पुढच्या टप्प्यात इतर कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना कोरोनावरील लस देता शक्य होणार आहे. जिल्ह्याची संपूर्ण तयारी झाली आहे. व राज्य सरकारची परवानगी नंतर लसीकरणाबाबत निर्णय घेण्यात येईल. परवानगी मिळताच लसीकरणाला सुरुवात केली जाईल. अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.

राज्यात सर्वच ठिकाणी ड्रायरन पूर्ण होत आली आहे. तसेच संपूर्ण राज्याची कोरोना लसीकरणाबाबतची तयारी पूर्ण आहे. केंद्र सरकारच्या अनुमतीने लसीकरणाला सुरुवात करणार असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी दिली. दरम्यान आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी कसबा बावडा येथील सेवा रूग्णालयाला भेट देत ड्रायरन केंद्राची पाहणी केली. तसेच डॉक्टर योग्य सल्ला आणि निवड झालेल्या लोकांची चौकशी केली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser