आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:असा प्रकार पुन्हा घडू नये, सरकारने खबरदारी घ्यावी; बेळगांव शिवभक्तांचा कर्नाटक सरकारला इशारा

कोल्हापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवरायांच्या अवमानाचा प्रकार बेळगाव जिल्ह्यात होत आहेत. असे प्रकार पुन्हा घडू नयेत याची खबरदारी राज्य सरकारने घ्यावी,अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा बेळगावातील समस्त शिवभक्तांच्या वतीने देण्यात आला आहे.

राज्य सरकारने अभ्यासक्रमातून शिवरायांचा धडा वगळण्याचा प्रकार केला. सदर प्रकार निंदनीय आहे. स्थापन करण्यात आलेला मणगुत्ती येथील शिव पुतळा, कोणतीही पूर्वकल्पना न देता काढण्यात आला. अभ्यासक्रमातून शिवरायांचा धडा वगळण्याचा संताप शिवप्रेमी मधून व्यक्त केला जात असताना, मनगुत्ती येथे घडलेला शिव पुतळा अवमान प्रकरणामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी.असे प्रकार पुन्हा घडू नयेत याची खबरदारी घेण्यात यावी अशी मागणी उपस्थित शिवभक्तांना मधून करण्यात आली. नेताजी जाधव, शुभम शेळके,किरण जाधव, सुनिल जाधव, श्रीकांत कदम,अभिषेक काकतीकर व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

याचबरोबर शिवसेना-राष्ट्रवादी अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी ही आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन मनगुत्ती येथील पुतळ्याची सन्मानाने प्रतिष्ठापना करण्यात यावी यासंदर्भात निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

बातम्या आणखी आहेत...