आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'संजय राऊत यांना त्याचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन', असे वक्तव्य करत भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जाहीर कार्यक्रमातून धमकी दिली आहे. उदयनराजे यांच्या या वक्तव्यामुळे सातारा येथील कार्यक्रमात एकच खळबळ उडाली.
राऊतांच्या वक्तव्यामुळे आक्रमक
काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील कार्यक्रम संपल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती घराण्याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. मावळ्यांमुळे छत्रपती असतात तसेच छत्रपतींच्या राजकीय पक्षातील प्रवेशाबाबत ते वक्तव्य होते. यावर छत्रपती घराण्याचे वारसदार उदयनराजे भोसले यांनी तेव्हा कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, गुरुवारी सातारा येथील एका कार्यक्रमात महाराष्ट्र केसरीच्या विजेत्यांचा सत्कार करताना उदयनराजे भोसले हे संजय राऊत यांच्यावर चांगलेच भडकले.
राजकीय पडसाद उमटणार
'संजय राऊत यांना त्याचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन' अशी धमकीच उदयनराजे यांनी स्टेजवरून दिली. या धमकीचे पडसाद आता राजकीय पटलावर उमटण्याची चिन्हे आहेत. यावर संजय राऊत नेमकी काय भुमिका घेतात याबाबतही उत्सुकता आहे.
महाराष्ट्र केसरीला राजेंकडून बुलेट
दरम्यान, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, उपविजेता प्रकाश बनकर आणि इतर गटातील विजेत्या पैलवानांचा सत्काराचा कार्यक्रम भाजप नेते, खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे करण्यात आला. यावेळी उदयनराजेंच्या हस्ते पृथ्वीराज पाटील यांना बुलेट देण्यात आली. तर, प्रकाश बनकर यांना होंडा युनिकॉन ही गाडी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा साताऱ्यात संपन्न झाल्यानंतर उदयनराजे मित्र परिवाराकडून ही बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. जी बुलेट पैलवान पृथ्वीराज पाटील यांना देण्यात आली, त्या गाडीला 007 हा खास नंबर उदयनराजेंनी घेऊन दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.