आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:दुचाकी-कारच्या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन तरुणांचा मृत्यू

सातारा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - पंढरपूर महामार्गावरील गोंदवले खुर्द येथील घोडके वस्ती परिसरात मंगळवारी दुचाकी व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीररीत्या जखमी झाले. अपघातातील तिघेही मृत युवक हे पळशी (ता. माण) येथील आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास माण तालुक्यातील गोंदवले खुर्द येथील घोडके वस्ती परिसरात बुलेट गाडी व कार क्र. एम.एच.०५ व्ही. ९६९५ या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत बुलेटवरील तुषार लक्ष्मण खाडे वय (२२), अजित विजयकुमार खाडे वय (२३), तर महेंद्र शंकर गौड वय ( २१ ) यांचा जागीच मृत्यू झाला तर स्विफ्ट चालक गणेश आनंदराव ढेंबरे (२८ ) व त्यांच्या बाजूला बसलेले आनंदराव ढेंबरे (६१ ) हे दोघेजण गंभीररीत्या जखमी झाले. जखमींना दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. कारचालक गणेश यांचा पाचवर्षीय मुलगा आश्चयकारकरित्या बचावला आहे. या अपघातात बुलेटवरील एकजण उडून समोरून येणाऱ्या क्रुझर गाडीच्या काचेवर जाऊन पडल्याने क्रुझरच्या काचेचा चुराडा झाला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये बुलेट सुमारे ३०० फूट विरुद्ध दिशेला फरफटत गेली.

कारमधील पाचवर्षीय मुलगा आश्चर्यकारक बचावला अपघातातील जखमी आनंदराव ढेंबरे हे ठाणे पोलिस दलातून सेवामुक्त झाले आहेत. त्यांचा मुलगा गणेश हा गावी दिडवाघवाडी येथे आपल्या पत्नी व मुलासह राहावयास आहे. त्याची पत्नी माहेरी पिंपरी चिंचवडला असल्यामुळे हे दोघे जण पिता पुत्र त्यांना भेटून गावी दिडवाघवाडीला परतत होते. गणेशचा ५ वर्षीय मुलगा विहान हासुध्दा त्यांच्यासोबत गावी निघाला होता. तो या भीषण अपघातात आश्चर्यकारकरीत्या बचावला आहे.

बातम्या आणखी आहेत...