आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र:महाराष्ट्रात 'टार्गेट' असलेले 'ट्रान्सफर मंत्रालय'; भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात एका नव्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे नाव - ट्रान्सफर मंत्रालय आहे. या मंत्रालयात कोणी एक दोन नाहीत. तर अनेक मंत्री आहे. या मंत्रालयाचे 'बजेट' नाही. मात्र 'टार्गेट' असते, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी ट्विटद्वारे केली आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. मंत्र्यांनी वरकमाई करून या बदल्या केल्या असून त्याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावरुन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मंत्री मुश्रीफ यांनी पाटील यांना बदली प्रकरणावरुन ' सौ चुहे खा के, बिल्ली चली हज को' असा टोला हाणला होता. तर आम. पाटील यांनी निष्ठा दाखविण्यासाठी मुश्रीफ यांची केविलवाणी धडपड सुरू असून 'आ बैल मुझे मार' अशी त्यांची सवय असल्याचा प्रतिटोला लगावला होता. त्यानंतर आम. पाटील यांनी पुन्हा बदल्यांवरुन राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.