आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:मणिकर्णिका कुंडाच्या उत्खननातून पुढे आला पुरातन वस्तूंचा खजिना

कोल्हापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • शिवलिंग, अश्वारुढ पार्वतीसह देवतांच्या मूर्ती सापडल्या

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात पुरातन मणिकर्णिका कुंडाच्या उत्खननाचे काम सुरू असून याठिकाणी तांब्याचे शिवलिंग, घड्याळ, नाणी, काचेचे कंदील , कोरीव दगड, कृष्ण, शिवलिंग, अश्वारुढ पार्वती, अन्नपूर्णा देवी अशा देवतांच्या मूर्ती, वीरगळ. तांबे व कासच्या भांडी, तांब्या, मापटे, बॅटरी जर्मन बनावटीची बंदूक... बंदुकीच्या पुंगळ्या अशा अनेकविध पूरातन वस्तू मनकर्णिका कुंडाच्या उत्खननातूत बाहेर निघाल्या आहेत.कुंडाच्या भिंती, भोवतीच्या ओवर्यांच्या कमानी, पायर्या दिसू लागल्या आहेत.

महालक्ष्मी (अंबाबाई ) मंदिराच्या आवारात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने साधारणतः आठ महिन्यांपासून उत्खननाचे काम सुरु असून पाण्याचे जिवंत झरे सापडण्यासाठी आणखी १३ फुटांपर्यंत खुदाई करण्यात येणार आहे. पुढील दीड महिन्यात कुंडाचे मुळ रुप प्रकाशात येईल अशी माहिती समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. मनकर्णिका कुंडाच्या उत्खननासंबंधी माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, हेरिटेज समितीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर, मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव, अभियंता सुयश पाटील, मंदिर व मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा, प्रसन्न मालेकर, पुरातत्व खात्याचे उत्तम कांबळे, नियंत्रण कक्षाचे राहूल जगताप, अभिजीत पाटील उपस्थित होते.

ते म्हणाले, सध्या कुंडाची २७ फुटापर्यंतची खुदाई झाली असून आणखी १३ फुटापर्यंत खुदाई होण्याची शक्यात आहे. या खुदाई दरम्यान कुंडाच्या आवारात शिवलिंगाची लहान मंदिरे, ओवऱ्या, वीरगळ या वास्तू प्रकाशात आल्या आहेत. तर तांबा-पितळ, कासचे तांबे, बादली, मापटे, बंदुकीच्या पुढची नळी, तांब्याचे पुंगळे, टाक, नाणी, कोरीव दगड असे अनेक साहित्य मिळाले आहेत. त्या साहित्यांची त्या त्या दिवशी नोंदी करुन ते सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. खुदाई पूर्ण झाल्यावर कुंडाची डागडुजी व सुधारणा करुन कुंडाचे मुळ स्वरुप प्रकाशात आणले जाईल.

बातम्या आणखी आहेत...