आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णमुद्रा:कोल्हापूर जिल्ह्यात कसबा बीडमध्ये सापडली त्रिशूळ छाप सुवर्णमुद्रा

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूरच्या शिलाहार राजवंशाची उपराजधानी आणि लष्करी तळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कसबा बीड (ता. करवीर) गावात नुकतीच कसबा बीडचे ग्रामस्थ मंगल सुनील बीडकर यांना त्रिशूळ छाप सुवर्णमुद्रा सापडली. गावातील श्री कल्लेश्वर मंदिर परिसरात शेतात हा बेडा त्यांना सापडला. स्थानिक भाषेत या सुवर्णमुद्रांना “बेडा’ असे संबोधतात. बीडकर यांना सापडलेला हा बेडा ६ मिमीचा असून त्यावरील अंकण अजूनही सुस्पष्ट आहे. याच्या एका बाजूवर त्रिशूळ आणि काही टिंबांचे अंकण तर दुसऱ्या बाजूवर उभवटा दिसतो. गेल्या वर्षीही कसबा बीड गावात सोने सापडण्याचा प्रकार घडला आहे. एवढ्या लहानशा तुकड्यावर इतके बारीक अंकण असल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त होत

बातम्या आणखी आहेत...