आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वाघबीळ नजीक भरघाव ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात कोल्हापूर कसबा बावडा येथील दोन तरूण जागीच ठार झाले. रविवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास हा अपघात झाला. नितीन आबासाहेब रणदिवे, वय 30, रा. रणदिवे गल्ली (पुर्व) व विशाल आबासाहेब हाके, वय 29, रा. कवलापूर जि. सांगली अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.
विशाल याचा दहा दिवसापूर्वीच विवाह झाला असून तो बावडा येथे मामाकडे रहायला होता. विशालची पत्नी लग्नानंतर माहेरी गेली आहे, ती परत येण्यापूर्वीच पतीच्या निधनाची बातमी तिला ऐकण्याची वेळ आली. नितीन रणदिवे हा बावडा परिसरातील नावाजलेला क्रिकेटपटू होता, तो विवाहित असून त्याला एक लहान मुलगा आहे.
नितीन व विशाल हे दोघे काल रात्री 11 च्या सुमारास दुचाकीवरून विशाळगडकडे चालले होते. पन्हाळा रोडवरील वाघबीळच्या येथील वळणावर त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरघाव ट्रकने जोराची धडक दिली त्यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने बावडा परिसरावर शोककळा पसरली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.